Псалтирь 70

Поспеши, Боже, избавить меня

1दाविदाचे स्तोत्र हे देवा, मला सोडव. हे परमेश्वरा, लवकर ये आणि मला मदत कर. 2जे माझा जीव घेऊ पाहतात, त्यांना लज्जित कर आणि गोंधळून टाक; माझ्या यातनेत आनंद मानणारे माघारी फिरोत आणि अपमानित होवोत; 3जे मला अहाहा! अहाहा! असे म्हणतात, ते आपल्या लाजेने मागे फिरोत.

4जे तुझा शोध घेतात ते सर्व तुझ्याठायी हर्षित आणि आनंदित होवोत; ज्यांना तुझे तारण प्रिय आहे, ते देवाची स्तुती असो असे नेहमी म्हणोत. 5पण मी गरीब आणि गरजवंत आहे; हे देवा, माझ्याकडे त्वरीत ये; तू माझा सहाय्यक आणि मला सोडवणारा तूच आहेस. हे परमेश्वरा, उशीर करू नकोस.

Скопировано!
Aa