Salmi 54

Dio è il mio aiuto

1दाविदाचे स्तोत्र हे देवा, तू आपल्या नावाने मला वाचव, आणि तुझ्या सामर्थ्यात माझा न्याय कर. 2हे देवा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या शब्दाकडे कान दे. 3कारण माझ्याविरूद्ध परके उठले आहेत, आणि दयाहीन माणसे माझ्या जीवाच्या मागे लागली आहेत; त्यांनी आपल्यापुढे देवाला ठेवले नाही.

4पाहा, देव माझा मदतनीस आहे; प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे. 5तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील; तू माझ्यासाठी आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश कर. 6मी तुला स्वखुशीने अर्पणे अर्पीण; हे परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देईन, कारण हे चांगले आहे.

7कारण त्याने मला प्रत्येक संकटातून सोडवले आहे; माझे डोळे माझ्या शत्रूंकडे विजयाने पाहतात.

Copiato!
Aa