Psalms 11
In the Lord I take refuge
1मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. परमेश्वरामध्ये मी आश्रय घेतो; पक्ष्यासारखे डोंगराकडे उडून जा, असे तुम्ही माझ्या जीवाला कसे म्हणता? 2कारण पाहा! सरळ हृदयाच्यांना अंधारात मारावे म्हणून, दुष्ट आपला धनुष्य वाकवतात आणि आपला तीर दोरीला लावून तयार करतात. 3कारण जर पायेच नष्ट केले, तर न्यायी काय करणार?
4परमेश्वर त्याच्या पवित्र स्वर्गात आहे; त्याचे डोळे पाहतात, त्याचे डोळे मनुष्याच्या संतानास पारखतात. 5परमेश्वर नितीमानाची पारख करतो. परंतू जे दुष्ट व हिंसा करतात त्यांचा तो द्वेष करतो. 6तो दुष्टांवर जळते निखारे आणि गंधकाचा वर्षाव करील, दाहक वारा हाच त्यांचा वाटा असेल.
7कारण परमेश्वर नितीमान आहे आणि त्यास न्यायीपण प्रिय आहे. सरळ असलेले त्याचे मुख पाहतील.
Copied!
Aa