Ezekiel 22

The city of bloodshed

1मग परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे येऊन म्हणाला, 2मग हे मानवाच्या मुला, तू न्याय करशील का? शहराच्या रक्ताचा न्याय तू करतो काय? त्याच्या सर्व घृणास्पद कामाची माहिती तुला आहे. 3मग तू म्हणावे परमेश्वर देव असे म्हणत आहे, असे दिवस येत आहेत की, या शहराच्या मध्य भागात रक्तपात करण्यात आला आहे. शहराने स्वतःला मूर्तीने अपवित्र केले आहे.

4तू सांडलेल्या रक्त्तासाठी तू दोषी आहेस आणि तू अपवित्र मूर्ती तयार केल्या आहेस, तू आपला काळ जवळ आणला आहेस. यास्तव मी तुझी खरड पट्टी राष्ट्रात काढेल व भूमीवर तुझा उपहास प्रत्येक डोळ्या समोर करेन. 5जे जवळ आहे व दूर आहे त्या दोघांचाही उपहास केला जाईल. तू शहराला अपवित्र केले आहेस, पूर्णपणे गोंधळलेले असे तुला नावलौकीक प्राप्त झाले आहे. 6पहा, इस्राएलाच्या शास्त्यानो तुमच्या स्वबळाने रक्तपात केला आहे.

7त्यांनी आपल्या आईबापांचा अनादर केला आहे. व त्यांनी तुमच्यामध्ये विदेशांच्या कारवाया केल्या आहे. तुमच्यातील विधवा आणि अनाथांना त्यांनी तुमच्या वाईट वागणुक दिली आहे. 8तू माझ्या पवित्र वस्तुंना तुच्छ लेखल्या आहेस व माझ्या शब्बाथाचा अनादर केला आहे. 9बदनामी कारक पुरुषांनी क्रमाने येऊन रक्त ओतले व उंच स्थानी जाऊन भोजन केले, व त्यांनी माझ्या पुढे दुष्टपणा केला आहे.

10तुझ्याकडे तुझ्या बापाची नग्नता उघड झाली आहे त्यांनी ऋतूमती अशुद्धतेत स्त्रिला भ्रष्ट केले आहे. 11ज्या पुरुषांनी आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीशी घृणास्पद वर्तन केले आहे. ज्या पुरुषाने आपल्या सुनेला लज्जास्पद अशुद्ध केले; असा पुरुष ज्याने आपल्या वडिलाच्या मुलीला बहिणीला भ्रष्ट केले ते सर्व कृत्ये तुझ्यामध्ये झालेले आहे. 12असा पुरुष रक्तपात करण्यासाठी लाच घेतो, तू अति प्रमाणात व्याज घेतो, तू तुझ्या कामाने शेजाऱ्याचे नुकसान केले आहेस, आणि तू मला विसरला आहेस. असे परमेश्वर देव जाहीर करतो.

13यास्तव तू केलेल्या अनादराच्या कामावर मी आपला हात उगारीन आणि तुझ्यामध्ये जो रक्तपात झाला आहे. 14जेव्हा मी तुझ्याशी करार केला आहे तेव्हा तुझे मन आणि तुझा हात बळकट कर असे परमेश्वर देव जाहीर करतो व ते मी करेनच. 15मी तुमची देशातून दाणादाण करेल व भूमीतून नाहीसे करेन, मी तुम्हास तुमच्या अशुद्धतेतून शुध्द करेन.

16मग तुम्ही राष्ट्राच्या देखत अशुद्ध व्हाल. मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे.

Dross in the furnace

17पुन्हा परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि म्हणाला. 18मानवाच्या मुला, इस्राएलाचे घराणे मला धातुच्या गाळाप्रमाणे झाले आहे. त्यामध्ये उरलेले पितळ, कथील, आणि लोखंड, शिसे आहे, ते भट्टीतल्या चांदीचा गाळ आहे. 19यास्तव परमेश्वर देव हे म्हणतो, कारण तुम्ही उरलेला गाळ झाला आहात. यास्तव पाहा! मी तुम्हास यरूशलेमेत एकत्र करीन.

20चांदी, पितळ, लोखंड, कथील, शिसे गोळा करून जसे तुम्हा मध्ये त्यांच्यात भट्टीत टाकले जाते तसे मी तुम्हास वितळवीन. यासाठी मी तुला माझ्या क्रोधाच्या अग्नीने एकत्र करीन, मी त्यांना भट्टीत वितळून टाकीन, तुम्हास त्यामध्ये ओतणी करेन. 21म्हणजे मी तुमच्यात माझ्या क्रोधाच्या अग्नीने त्यांच्यावर ओतणी करेन. 22जसे चांदीला भट्टीत अग्नीने वितळवले जाते, तसा तू त्यांच्यात वितळविला जाशील मग तुला कळेल मी परमेश्वर देवाने तुझ्या विरुध्द त्वेषाची ओतणी केली आहे.

No one to stand in the gap

23परमेश्वर देवाचा शब्द माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, 24‘मानवाच्या मूला’ तिला सांग तू अशी भूमी आहेस जी अजून शुध्द झाली नाही, क्रोधाच्या दिवसात पाऊस पडणार नाही. 25तुझ्यामध्ये असलेल्या संदेष्टयांच्या विरुध्द कारस्थान तुझ्यात आहे, जसा गर्जना करणारा सिंह आपल्या भक्षाला फाडून टाकतो, ते जीवन संपवून टाकतो आणि त्याने तिच्यात अनेकांना विधवा बनवले.

26तिचे याजक माझ्या नियमांच्या विरुध्द दंगल माजवतात; ते माझ्या पवित्र वस्तुबद्दल अनादर दाखवतात, ते पवित्र वस्तू आणि अपवित्रतेची तुलना करीत नाही. त्यांनी आपले डोळे माझ्या शब्बाथावरुन बंद केले आहेत. यास्तव त्यांच्यात माझा अनादर झाला आहे. 27त्यांच्या राज कुमारी या लांडग्या प्रमाणे बळी घेणारे व रक्तपात करणारे आहेत. आपल्या हिंसाचारासाठी ते जीवाचा घात करतात. 28आणि त्यांचे द्रष्टे चुना लावलेल्या भिंतीसारखे आहेत ते खोटा दृष्टांत बघतात आणि खोटा शकुन सांगतात व परमेश्वर बोलला नसताही प्रभू परमेश्वर बोलला असे म्हणतात.

29भूमितील लोक पिळवणुकीने दबून गेले आहेत आणि डाका टाकून लुटून टाकतील व ते गरीब, गरजूंना वाईट वागणुक देतात तसेच विदेशांना अन्यायाने दाबून टाकतात. 30मग मी मानवाचा शोध घेतला जो बुरुज बांधून घेईल आणि जो माझ्या पुढे उभा राहील ती भूमिला भित असेल ज्याचा विध्वंस मी करणार नाही. 31मग मी माझ्या संतापाची ओतणी त्यांच्यावर करीन, मी माझ्या संतापाच्या अग्नीने त्यांना संपवून टाकीन आणि त्यांचा मार्ग त्यांच्या डोळ्यापुढे सिध्द करेन. असे परमेश्वर देव जाहीर करत आहे.

Copied!
Aa