Ezekiel 11

The counselors of wickedness

1नंतर परमेश्वर देवाच्या घराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराकडे देवाच्या आत्म्याने मला उचलून नेले. आणि पहा! प्रवेशद्वाराजवळ मी पंचवीस माणसे उभी असलेली पाहिली. त्यांच्यामध्ये अज्जूरचा मुलगा याजन्या आणि पलट्या मुलगा बनाया, हे लोकांचे पुढारी त्यांच्यामध्ये होते. 2परमेश्वर देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, हे लोक पापाची योजना करणारे आहेत, आणि हे शहरात दुष्ट योजना योजीतात. 3ते म्हणतात, ‘घरे बांधण्याचा समय अजून जवळ आला नाही, हे शहर भांडे आहे, आणि आपण मांस आहोत.’ 4म्हणून मानवाच्या मुला त्यांच्या विरोधात भविष्यवाणी कर.” 5त्यानंतर परमेश्वर देवाचा आत्मा माझ्यावर आला आणि तो मला म्हणाला परमेश्वर देव असे सांगतो असे म्हण, तू असे इस्राएलाच्या घराण्यास सांगितल्यास त्यांच्या मनात आलेले विचार मी ओळखतो.

6शहरात, रस्त्यावर मारलेल्या लोकांस, दुप्पट करा आणि रस्त्ये त्यांनी भरुन टाका. 7म्हणून परमेश्वर देव म्हणतो, ज्या लोकांस तुम्ही मारले त्यांची प्रेते यरूशलेम शहराच्या मध्यभागी ठेवलेली आहेत, हे शहर भांडे आणि ते मांस आहेत, पण तुम्ही त्यांना शहराच्या मध्य भागातून घेऊन यायचे आहे. 8तुम्ही तलवारीला घाबरला, तर मी तलवार तुम्हावर आणिन, हे परमेश्वर देवाचा जाहीर नामा आहे 9मी तुम्हास शहराच्या मध्य भागातून घेऊन येईन आणि परदेशांच्या मस्तकावर तुम्हास ठेवीन, कारण त्यांच्या विरुध्द न्याय करेन.

10त्यांचा पाडाव मी तलवारीने करेन. इस्राएलाच्या वेशीत त्याचा न्याय करेन मग तुम्हास कळेल की मी परमेश्वर देव आहे. 11हे शहर तुमचे अन्न शिजवण्याचे भांडे होणार नाही. त्यांच्यामध्ये ते मांसही होणार नाही. मी इस्राएलाच्या वेशीच्या आत तुमचा न्याय निवाडा करणार आहे. 12मग तुम्हास कळेल मी परमेश्वर देव आहे, जो कोणी मूर्ती पुढे चालत नाही आणि ज्यांनी ठरवीले ते बाहेर येणार नाही, त्याऐवजी, सभोवतालच्या राष्ट्राचे निर्णय तुम्ही घेऊन जाल.

A heart of flesh

13मी केलेल्या भाकीतानुसार बाहेर ये, पलट्याचा मुलगा बनाया मरण पावला. मग मी पालथा पडून मोठ्या आवाजाने म्हणालो, “आहा! हे प्रभू परमेश्वर देवा तू उरलेल्या इस्राएलाच्या लोकांस पूर्ण शेवट केलास काय?” 14परमेश्वर देवाचा शब्द मला कळला, व मला म्हणाला, 15“मानवाच्या मुला, जे यरूशलेमनिवासी, तुझे भाऊबंद, तुझे भाऊबंदच, इस्राएल घराण्यातील प्रत्येक मानवाचे वंशज. जे सांगतात इस्राएल देश आम्हास मिळाला आहे, ते परमेश्वर देवापासून लांब आहेत, ही भूमी आम्हास वतन म्हणून दिलेली आहे.

16म्हणून परमेश्वर देव असे म्हणतो, मी त्यांना देशातून फार लांब बाहेर नेईन, त्यांना विखुरलेले असे सर्व भूमीत करीन, तरी मी काहीकाळ त्यांच्यासाठी पवित्र ठिकाण असे करीन जेथे ते जाणार आहे. 17म्हणून परमेश्वर देव असे म्हणतो, जेथून तुम्ही विखुरले गेलात त्याच ठिकाणी आणून तुम्हास एकत्र करीन आणि मी इस्राएल देश तुम्हास देईन. 18मग ते तेथील सर्व तिरस्कार आणणाऱ्या व ओंगळ व घृणास्पद त्या ठिकाणाहून काढून टाकेल.

19आणि मी तुम्हास एक मन देईन, आणि मी तुम्हात नवीन आत्मा घालीन जेव्हा ते माझ्या जवळ येतील, त्यांच्यातील दगडरुपी मन काढून त्यांना नवे मांसमय मन देईन. 20मग मी ठरवेन तसे ते चालतील, ते माझे फर्मान पाळतील आणि त्या प्रमाणे करतील. तर ते माझे लोक आणि मी त्यांचा परमेश्वर होईन. 21पण जे कोणी ओंगाळ गोष्टीच्या प्रेमाकडे आणि घृणास्पद कार्य करेल मी त्यांचे वर्तणुक त्यांच्या माथी आणिन. मी परमेश्वर देव आहे असे जाहीर करतो.”

The glory leaves the city

22तेव्हा करुबांनी आपल्या पंखांनी वर उचलून घेतले आणि चाके त्यांच्या बाजूला होती आणि इस्राएलाच्या देवाचे गौरव हे सर्वोच्च होते. 23शहराच्या मध्य भागातून परमेश्वर देवाचे गौरव वर निघून गेले, आणि शहराच्या पूर्व भागात पर्वतावर स्थिर उभे राहीले. 24आणि देवाच्या आत्म्याने मला दृष्टांतात उंच नेले व खास्द्यांच्या देशात हद्दपार नेले. आणि दृष्टांतात मला वर उचलून नेले असे मी पाहिले.

25मग मी हद्दपार असलेल्यांना सर्व काही जाहीर केले जे परमेश्वर देवाने मला सांगितले होते.

Copied!
Aa