Psalmen 65

Du krönst das Jahr mit deinem Gut

1दाविदाचे स्तोत्र हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो; तुला केलेला आमचा नवस तेथे फेडण्यात येईल. 2जो तू प्रार्थना ऐकतोस, त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते. 3दुष्कर्मांनी आम्हांला बेजार केले आहे. आमचे अपराध तर तूच क्षमा करशील.

4ज्या मनुष्यास तू निवडून आपल्याजवळ आणतो तो धन्य आहे, याकरिता की; त्याने तुझ्या अंगणात रहावे. तुझ्या घराच्या, तुझ्या मंदिराच्या उत्तम पदार्थांनी आम्ही तृप्त होऊ. 5हे आमच्या तारणाऱ्या देवा, जो तू पृथ्वीच्या सर्व सीमांचा आणि दूर समुद्रावर जे आहेत त्यांचा भरवसा आहेस, तो तू न्यायीपणाने अतिआश्चर्यकारक गोष्टींनी आम्हास उत्तरे देतोस. 6कारण तू आपल्या सामर्थ्याने कंबर बांधून, पर्वत दृढ केले आहेत.

7तू गर्जणाऱ्या समुद्राला, त्यांच्या लाटांच्या गर्जनेला आणि लोकांचा गलबला शांत करतो. 8जे पृथ्वीच्या अगदी शेवटच्या भागामध्ये राहतात ते तुझ्या कृत्याच्या चिन्हांमुळे भितात; तू पूर्व आणि पश्चिम यांना आनंदित करतोस. 9तू पृथ्वीला मदत करण्यासाठी आला; तू तिला पाणी घालतोस; तू तिला फारच समृद्ध करतोस; देवाची नदी जलपूर्ण आहे; तू भूमी तयार करून मनुष्यजातीला धान्य पुरवतोस.

10तू तिच्या तासांना भरपूर पाणी देतोस; तू तिचे उंचवटे सपाट करतोस; तू तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस. तिच्यात अंकुरीत झालेले आशीर्वादित करतोस 11तू तुझ्या चांगुलपणाने वर्ष मुकुटमंडीत करतोस; तुझ्या रथामागील वाटेतून पृथ्वीवर खाली समृद्धी गाळतो. 12रानातील कुरणावर त्या समृद्धी गाळतात आणि डोंगर उल्लासाने वेढलेले आहेत.

13कुरणांनी कळप पांघरले आहेत; दऱ्यासुद्धा धान्यांनी झाकल्या आहेत. ते आनंदाने आरोळी मारीत आहेत आणि ते गात आहेत.

Kopiert!
Aa