Hosea 14
Kehre um, Israel
1हे इस्राएला, आपला देवा परमेश्वर याकडे परत ये, तुझ्या दुष्टपणामुळे तुझे पतन झाले आहे. 2कबुलीच्या शब्दासोबत परमेश्वराकडे वळा, त्यास म्हणा, आमचे अधर्म दूर कर आणि दयेने आमचा स्वीकार कर म्हणजे आम्ही तुझी स्तुती करु, आपल्या ओठांचे फळ तुला अर्पू. 3अश्शूर आम्हास तारणार नाही, आम्ही युध्दासाठी घोड्यावर स्वार होणार नाही, यापुढे आमच्या हाताच्या मूर्तीस आमचा देव म्हणणार नाही, कारण तुझ्यामध्ये अनाथांना दया प्राप्त होते.
Ich will ihre Abtrünnigkeit heilen
4ज्यांनी मला सोडले ते जर परत मजकडे आले तर मी त्यांना आरोग्य देईन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण माझा त्यांच्यावरचा राग गेला आहे. 5मी इस्राएलास दहीवरासारखा होईल, तो भुकमळासारखा फुलेल आणि लबानोनात देवदारूप्रमाणे मुळ धरील. 6त्याच्या फांद्या पसरतील, त्याची सुंदरता जैतून वृक्षासारखी होईल, आणि त्याचा सुगंध लबानोनातील देवदार वृक्षासारखा होईल.
7त्याच्या सावलीत राहणारे लोक परत येतील, ते धान्यासारखे पुनर्जिवित होतील; आणि द्राक्षाप्रमाणे फळ देतील, त्याची प्रतिष्ठा लबानोनाच्या द्राक्षरसासारखी होईल. 8एफ्राईम म्हणेल, या मूर्त्यांचे मी काय करु? मी त्यास उत्तर देईन त्याची काळजी घेईन मी सारखा सदाहरित आहे, माझ्यातून तुला फळ मिळते. 9कोण चतुर आहे ज्याला या गोष्टी समजतील? कोण समंजस आहे ज्याला ते समजेल? परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत, आणि धार्मिक त्यामध्ये चालतील पण बंडखोर त्यामध्ये अडखळून पडतील.