요한2서 1

장로의 문안

1वडिलांकडून देवाने निवडलेली स्त्री कुरिया व तिच्या मुलांना, सत्यात सहभागी असलेल्या लोकांप्रमाणे ज्यांच्यावर मी प्रीती करतो आणि तुमच्यावर प्रीती करणारा मी एकटाच नाही, तर ज्यांची सत्याशी ओळख झाली आहे असे इतर सर्वजणसुद्धा प्रीती करतात. या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते, ते आमच्यामध्ये सर्वकाळ राहील. 2देवपित्यापासून आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याजपासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपणाबरोबर राहोत. 3पित्याने आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुझी काही मुले सत्यात चालतात असे मला दिसून आले यावरुन मला फार आनंद झाला.

사랑 가운데 행하라

4आणि स्त्रिये, मी तुला आता, विनंती करतो की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. ही मी तुला नवी आज्ञा करतो असे नाही, तर जी प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच लिहितो. 5आणि त्याच्या आज्ञेत चालणे म्हणजेच प्रीती करणे होय. हीच आज्ञा आहे जी तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे. 6कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे.

미혹하는 자들을 조심하라

7आम्ही केलेले काम तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे, म्हणून खबरदारी घ्या. 8ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्यास देव प्राप्त झाला नाही. जो ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून राहतो त्यास पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. 9हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्यास घरात घेऊ नका किंवा त्यास सलामही करू नका.

10कारण जो कोणी त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्मांचा भागीदार होतो. 11मला जरी अनेक गोष्टी तुम्हास लिहायच्या आहेत तरी त्या तुम्हास मी शाई व लेखणीने लिहू इच्छित नाही. तर त्याऐवजी तुम्हास भेटावे व प्रत्यक्ष सर्वकाही बोलावे अशी आशा मनात बाळगून आहे. म्हणजे आपला आनंद त्यामुळे परिपूर्ण होईल.

얼굴을 대하여 말하기를 원하노라

12देवाने निवडून घेतलेल्या तुमच्या बहिणीची मुले तुम्हास सलाम सांगतात.

복사됨!
Aa