신명기 14
정한 음식과 부정한 음식
1तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. तेव्हा कोणी मरण पावले तर अंगावर वार करून घेणे, मुंडण करणे असे करु नका. 2कारण इतरांपेक्षा तुम्ही वेगळे आहात. तुमचा देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहात. आपली खास प्रजा म्हणून त्याने भुतलावरील सर्व राष्ट्रातून तुमची निवड केली आहे. 3परमेश्वरास ज्यांची घृणा वाटते असे काही खाऊ नका.
4खाण्यास पात्र असे पशू हे, गाय बैल, शेळ्या, मेंढ्या, 5सांबर, हरीण, रानमेंढा दुभंगलेल्या खुरांचा आणि रवंथ करणारा कोणताही प्राणी खाण्यास योग्य आहे. 6पशूपैकी ज्यांचे खूर चिरलेले किंवा दुभंगलेले आहेत व जे रवंथ करतात अशा पशूंचे मांस तुम्ही खावे.
7पण उंट, ससा व शाफान खाऊ नका. कारण ते रवंथ करणारे असले तरी त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत. तेव्हा ते खाण्यास अशुद्ध समजावेत. 8डुक्करही खाऊ नये. त्याचे खूर दुभंगलेले आहे पण तो रवंथ करत नाही. तेव्हा तेसुध्दा अशुद्ध होय. त्याचे मांस खाऊ नका, तसेच मरण पावलेल्या डुकराला स्पर्शही करु नका. 9जलचरांपैकी पंख आणि खवले असलेला कोणताही मासा खा.
10पण ज्यांना पंख आणि खवले नाहीत असा मासा खाऊ नका. ते अशुद्ध अन्न होय. 11कोणताही शुद्ध पक्षी खा. 12पण गरुड, लोळणारा गीध, मत्स्यमाऱ्या, 13ससाणा, वेगवेगळ्या जातीच्या घारी, 14कोणत्याही जातीचा कावळा, 15निरनिराळ्या जातीचे शहामृग, गवळणा, कोकीळ, बहिरी ससाणा, 16पिंगळा, मोठे घुबड व पांढरे घुबड, 17पाणकोळी, गिधड, करढोक,
18निरनिराळ्या जातीचे बगळे, करकोचे, टिटवी, वटवाघूळ यापैकी कोणताही पक्षी खाऊ नये. 19पंख असलेले कीटक खाण्यास अशुद्ध होत. तेव्हा ते खाऊ नयेत. 20पण कोणताही शुद्ध पक्षी खायला हरकत नाही.
21नैसर्गिक मृत्यू आलेला कोणताही प्राणी खाऊ नका. तो तुम्ही नगरात आलेल्या परक्या पाहुण्याला देऊ शकता. त्यास तो खायला हरकत नाही किंवा त्यास तुम्ही तो विकू शकता. पण तुम्ही मात्र तो खाऊ नका. कारण तुम्ही परमेश्वर तुमचा देव ह्याची पवित्र प्रजा आहात. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नका.
소출의 십일조
22दरवर्षी तुमच्या शेतात पिकवलेल्या धान्याचा एक दशांश हिस्सा काढून ठेवा. 23मग परमेश्वराने निवडलेल्या त्याच्या वस्तीच्या ठिकाणी, त्याचा सहवास मिळावा म्हणून जा. धान्य, नवा, द्राक्षरस, तेल यांचा दहावा भाग, गुराढोरांचा पहिला गोऱ्हा यांचे तेथे सेवन करा. असे केल्याने तुमच्या परमेश्वर देवाबद्दल सतत भय बाळगण्यास शिकशील. 24पण एखाद्यावेळी हे ठिकाण फार दूर असेल तर हे सर्व तेथपर्यंत वाहून नेणे तुम्हास शक्य होणार नाही. असे झाले तर, तुझा देव परमेश्वर याच्या आशीर्वादाने मिळेल त्याचा दंशमांश तुला तिकडे घेवून जाता आला नाही, 25तेवढा भाग तुम्ही विकून टाका. तो पैसा गाठिला बांधून तुझा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी जा.
26त्या पैशाने तुम्ही गाई-गुरे, शेळ्यामेंढ्या, द्राक्षरस, मद्य किंवा कोणताही खाद्यपदार्थ विकत घ्या. आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर सहकुटुंब सहपरिवार त्याचा आनंदाने उपभोग घ्या. 27हे करताना तुमच्या नगरातील लेवींना वगळू नका. त्यांनाही यामध्ये सामील करून घ्या. कारण तुमच्याप्रमाणे त्यांना जमिनीत वाटा मिळालेला नाही. 28प्रत्येक तीन वर्षांनी त्या वर्षांच्या उत्पन्नातील दहावा भाग काढून ठेवा. गावातील इतरांसाठी म्हणून हे धान्य गावात वेगळे साठवून ठेवा.
29लेवींना तुमच्यासारखे वतन नाही म्हणून त्यांनी तसेच इतर गरजूंनीही यातून धान्य घ्यावे. नगरात आलेले परकीय, विधवा, अनाथ मुले यांच्यासाठीही ते आहे. असे वागलात तर तुमचा देव परमेश्वर तुम्हास सर्व कार्यात आशीर्वाद देईल.