Números 3

Os filhos de Arão

1जेव्हा परमेश्वर सीनाय पर्वतावर मोशेशी बोलला त्याकाळचा अहरोन व मोशे ह्याच्या वंशावळीचा इतिहास आता हा असाः 2अहरोनाच्या मुलांची नावे हीः नादाब हा प्रथम जन्मलेला, व अबीहू, एलाजार व इथामार. 3अहरोनाचे हे पुत्र जे अभिषेक केलेले याजक होते, ज्यांना त्याने याजकपदात सेवा करण्यासाठी समर्पित केले, त्यांची नावे ही आहेत 4परंतु नादाब व अबीहू परमेश्वराची सेवा करिताना सीनाय रानात परमेश्वरापुढे अस्विकारनीय अग्नी अर्पिला तेव्हा ते परमेश्वरापुढे मरण पावले. त्यांना पुत्र नव्हते म्हणून एलाजार व इथामार हे आपला बाप अहरोन हयात असताना याजक होऊन परमेश्वराची सेवा करीत असत.

Os levitas servem aos sacerdotes

5परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, 6लेवीच्या वंशाला आण आणि त्यांना अहरोन याजकासमोर त्यास मदत करण्यास हजर कर. 7अहरोन व सर्व मंडळी दर्शनमंडपामध्ये सेवा करीत असता लेवी लोक त्यांना मदत करतील. त्यांनी निवासमंडपात सेवा करावी.

8त्यांनी दर्शनमंडपामधील सर्व वस्तूंची काळजी घ्यावी आणि इस्राएल वंशांना निवासमंडपाच्या सेवेत त्यांना सामान वाहण्यास मदत करावी. 9अहरोन व त्याच्या मुलांना तू लेवींच्या हाती दे. इस्राएल लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना पूर्णपणे मदतीसाठी देण्यात आले आहे. 10“अहरोन व त्याचे पुत्र यांची याजक म्हणून नेमणूक कर. त्यांनी याजक म्हणून आपले सेवेचे काम करावे. कोणी परका जवळ आल्यास त्यास जिवे मारावे.” 11परमेश्वर मोशेशी बोलला तो म्हणाला, 12पाहा, मी इस्राएल लोकांतील प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी आता माझी सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांस निवडून घेत आहे. लेवी माझेच असतील.

13“सर्व प्रथम जन्मलेले माझेच आहेत. मी मिसर देशात सर्व प्रथम जन्मलेल्यांना मारून टाकले. त्याच दिवशी इस्राएल लोकांतील पुरुषांपैकी व पशूपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरवले. ते माझेच आहेत. मी परमेश्वर आहे.”

Os levitas são contados

14परमेश्वर सीनाय रानात पुन्हा मोशेशी बोलला. तो म्हणाला, 15“लेवी वंशातील जितके पुरुष व एक महिन्याचे किंवा त्याहून अधिक वयाची मुले असतील त्यांची, त्यांच्या कुळाप्रमाणे व त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर.” 16मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्यास झालेल्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्यांची गणती केली.

17लेवींच्या मुलांची नावे गेर्षोन, कहाथ व मरारी होते. 18गेर्षोनाच्या मुलांची नावे त्यांच्या कुळावरून ही आहेत. लिब्नी व शिमी. 19कहाथाचे पुत्र त्यांच्या कुळाप्रमाणे हे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल.

20मरारीचे पुत्र त्यांच्या कुळाप्रमाणे हे: महली व मूशी. ही लेवी कुळातील घराणी होत.

O clã de Gérson

21गेर्षोनापासून लिब्नी व शिमी ही कुळे चालू झाली ही गेर्षोनी कुळे. 22या दोन कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष मिळून सात हजार पाचशे होते. 23गेर्षोन कुळांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे पश्चिमेच्या बाजूस पवित्र निवासमंडपाच्या मागे आपले डेरे दिले.

24लायेलाचा मुलगा एल्यासाप हा गेर्षोनी घराण्याचा सरदार होता. 25दर्शनमंडपामधील निवासमंडप, तंबू आणि त्यावरील आच्छादन, दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराचा पडदा यांची निगा राखण्याचे काम गेर्षोनी लोकांवर सोपविण्यात आले. 26पवित्र निवासमंडप व वेदी ह्यांच्या सभोंवतीच्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा, त्यांच्यासाठी लागणारे तणावे व इतर सामान यांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.

O clã de Coate

27कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जियेल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे. 28या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष आठ हजार सहाशे होते. पवित्रस्थळातील वस्तूची निगा राखण्याचे काम कहाथी कुळांना देण्यात आले. 29कहाथी कुळांनी निवासमंडपाच्या दक्षिणेस आपली छावणी उभारली.

30उज्जियेलाचा मुलगा अलीसापान हा कहाथी घराण्याचा पुढारी होता. 31पवित्र कराराचा कोश, मेज, दीपस्तंभ, वेद्या, पवित्रस्थानाची सेवेसाठी असलेली पात्रे, पडदा व इतर सर्व वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. 32अहरोनाचा मुलगा एलाजार याजक हा लेवी लोकांच्या पुढऱ्यांचा पुढारी होता. पवित्र वस्तूचे रक्षण करण्याचे काम ज्यांच्यावर सोपवले होते त्या सर्वांवर देखरेख करणारा तो प्रमुख होता.

O clã de Merari

33मरारीपासून महली व मुशी ही घराणी चालू झाली ही मरारी कुळे. 34या कुळात एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष सहा हजार दोनशे होते. 35अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा मरारी घराण्याचा पुढारी होता. या कुळांना पवित्र निवासमंडपाच्या उत्तरेकडचा भाग दिला होता तेव्हा त्यांनी तेथे आपली छावणी ठोकली.

36मरारी वंशातील लोकांस पवित्र निवासमंडपाच्या फळ्या व त्यांचे सर्व अडसर, खांब व उथळ्या आणि पवित्र निवासमंडपाच्या फळ्यांशी निगडीत अशा सर्व वस्तूंची निगा राखण्याचे काम देण्यात आले; 37तसेच पवित्र निवासमंडपाच्या अंगणासभोंवतीचे सर्व खांब, त्यांच्या बैठका, उथळ्या, मेखा आणि तणाव्याचे दोर यांची ही देखभाल करण्याचे काम त्यांनी घेतले.

Moisés e Arão diante da tenda

38मोशे, अहरोन व त्याचे पुत्र यांची छावणी दर्शनमंडपाच्या समोर असलेल्या पवित्र निवासमंडपाच्या पूर्वेस होती. इस्राएल लोकांच्यावतीने पवित्र निवासस्थानाच्या रक्षणाचे काम त्यांना देण्यात आले. सर्व इस्राएलाकरिता त्यांनी हे काम केले. कोणी दुसरा पवित्र निवासस्थानाजवळ आल्यास त्यास जिवे मारावे असा त्यांना आदेश होता. 39लेवी वंशातील एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष यांची गणती करण्यास परमेश्वराने मोशे व अहरोन ह्याना सांगितले, तेव्हा पुरुष लेवीची एकूण संख्या बावीस हजार भरली.

O resgate dos primogênitos

40परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांपैकी जितके प्रथम जन्मलेले, एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुत्र व पुरुष असतील त्यांच्या नांवाची एक यादी तयार कर; 41आता मी इस्राएलाचे प्रथम जन्मलेले पुत्र व पुरुष घेणार नाही, त्याऐवजी मी परमेश्वर, लेवी वंशाचे लोक घेईन, तसेच इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या पशूंच्या ऐवजी लेवी लोकांच्या पशूंचे प्रथम जन्मलेले घेईन.” 42तेव्हा मोशेने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले, त्याने इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वाची गणती केली.

43मोशेने प्रथम जन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे जे इस्राएल पुत्र व पुरुष होते त्यांच्या नांवाची यादी केली. त्या यादीत बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर नांवे होती. 44परमेश्वर मोशेशी पुन्हा बोलला. तो म्हणाला, 45इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या ऐवजी तू लेवी लोक घे आणि इस्राएलांच्या पशू ऐवजी लेवी लोकांचे पशू घे, कारण लेवी माझेच आहेत. मी परमेश्वर आहे.

46लेवी लोक बावीस हजार आहेत आणि इस्राएल लोकांच्या कुळात प्रथम जन्मलेले बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर आहेत. म्हणजे इस्राएलातील प्रथम जन्मलेल्यांपैकी दोनशे त्र्याहत्तर पुत्र अधिक शिल्लक राहतात. 47त्यांना सोडवून घेण्यासाठी प्रत्येकाकडून पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे पाच पाच शेकेल घे. एक शेकेल म्हणजे वीस गेरा. 48प्रथम जन्मलेल्यांच्या सोडवणुकीचे जे अधिक पैसे येतील तो पैसा अहरोन व त्याच्या मुलांना दे.

49आणि लेव्यांकडून ज्यांची खंडणी झाली त्यांच्याहून जे अधिक होते त्यांच्यापासून त्यांच्या खंडणीचा पैसा मोशेने घेतला. 50इस्राएलांच्या प्रथम जन्मलेल्याकडून त्याने जे पैसे घेतले अधिकृत पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे मोशेने एकूण एक हजार तीनशे पासष्ट शेकेल भरले. 51मोशेने खंडणीचे पैसे अहरोन व त्याच्या मुलांना दिले. जशी परमेश्वराने त्यास आज्ञा केली होती ती प्रत्येक गोष्ट परमेश्वराच्या वचनानुसार मोशेने केली.

Copiado!
Aa