Mateo 4
La tentación en el desierto
1मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्यांस अरण्यात नेले. 2चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केल्यानंतर येशूंना भूक लागली. 3तेव्हा परीक्षक येशूंची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा कर.” 4परंतु येशूंनी उत्तर दिले, “कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर, देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.’” 5मग सैतानाने त्यांस यरूशलेम या पवित्र शहरात नेले व परमेश्वराच्या भवनाच्या टोकावर उभे केले.
6आणि त्यास म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी घे, कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की; ‘देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय दगडावर आपटू नयेत म्हणून ते तुला आपल्या तळहातावर झेलून घेतील.’” 7येशूंनी त्यास म्हटले, “असेही लिहिले आहे की, ‘तुझा देव, जो प्रभू, याची परीक्षा पाहू नको.’” 8मग सैतानाने त्यांस एका अतिशय उंच पर्वतावर नेले व त्याने त्यांस जगाची सर्व राज्ये, त्यांतील सर्व ऐश्वर्यासहीत दाखवली.
9आणि तो त्यांस म्हणाला, “जर तू मला नमन करशील व माझी उपासना करशील तर हे सर्व काही मी तुला देईन.” 10येशूंनी त्यास म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर आणि त्यालाच नमन कर.’” 11मग सैतान येशुंना सोडून निघून गेला आणि देवदूत येऊन येशुंची सेवा करू लागले.
Jesús comienza a predicar
12योहानाला तुरूंगात टाकले आहे हे जेव्हा येशूने ऐकले तेव्हा तो गालील प्रांतात निघून गेला. 13नासरेथ सोडून जबुलून व नफताली यांच्या सीमेतील, गालीलच्या सरोवराच्या कफर्णहूमात तो जाऊन राहिला. 14यशया संदेष्ट्याने पूर्वी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे यासाठी हे झाले. ते असे होते की, 15“जबुलून आणि नफताली हा प्रांत, सरोवराच्या किनाऱ्यावरील, यार्देनेच्या पलीकडील प्रदेश व परराष्ट्रीय गालील 16जे लोक काळोखांत बसत होते त्यांनी, मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या सावलीत दव प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर, ज्योति उदय पावली आहे.” 17तेव्हापासून येशूने उपदेश करणे सुरु केले व तो म्हणू लागला की; “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे.”
Jesús llama a los primeros discípulos
18नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना त्याने जाळे टाकतांना पाहिले कारण ते मासे पकडणारे होते. 19येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या, म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.” 20मग ते लगेचच जाळे सोडून देऊन त्याच्यामागे चालू लागले.
21येशू तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ; जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना त्यांचे वडील जब्दी याच्याबरोबर होडीत पाहीले. ते जाळे नीट करत होते. त्याने त्यांना बोलावले, 22तेव्हा ते दोघेही लगेचच आपली होडी व आपले वडील यांना सोडून त्याच्यामागे गेले.
Jesús sana a las multitudes
23गालील प्रांतात सगळीकडे फिरत, येशूने त्यांच्या सभास्थानात जाऊन शिकविले, देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे विकार बरे केले. 24येशूविषयीची बातमी सर्व सिरीया प्रांतभर पसरली; मग जे आजारांनी व अनेक प्रकारच्या रोगांनी पीडीत होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षघात झाला होता अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि येशूने त्यांना बरे केले. 25मग गालील प्रांत, दकापलीस नगर, यरूशलेम शहर, यहूदीया प्रांत व यार्देन नदीच्या पलीकडून आलेल्या लोकांचे मोठे समुदाय त्याच्यामागे चालू लागले.